Latest News

 • Great Bhet : Dr. Narendra Jadhav (Video of Interview on IBN Lokmat Tv)


 • डॉ. नरेंद्र जाधव यांचा मुक्त-संवाद

  पुणे मराठी ग्रंथालयाच्या अभ्यासिका विभागाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्ताने अभ्यासिकेच्या ‘आजी-माजी विद्यार्थ्यांचा मेळावा’ पुणे येथे दि. २० ऑक्टोबर २०१३ रोजी आयोजित करण्यात आला होता.
  आजी-माजी विद्यार्थ्यांच्या या मेळाव्यात डॉ. नरेंद्र जाधव यांनी शेकडो विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यावेळी सामाजिक, आर्थिक आणि इतर विषयांसंबधी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. जाधव यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. जवळ जवळ दीड-तास चाललेल्या या रंगतदार कार्यक‘माची ही काही क्षणचित्रे...

  Dr Narendra JadhavDr Narendra Jadhav

 • डॉ. नरेंद्र जाधव यांची ‘साहित्य आणि संवाद-यात्रा’

  ग्रंथाली प्रकाशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित डॉ. नरेंद्र जाधव यांच्या ‘साहित्य आणि संवाद यात्रा’ या प्रकल्पाचे उद्घाटन १९ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे करण्यात आले, त्या प्रसंगाची काही क्षणचित्रे.
  सदर ‘साहित्य आणि संवाद यात्रा’ मराठवाड्यातील औरंगाबाद येथे (२० ते २२ ऑक्टोबर २०१३), लातूर (२४ ते २६ ऑक्टोबर २०१३) आणि नांदेड (२७ ते २९ ऑक्टोबर २०१३) या दिवशी पुस्तक प्रदर्शन आयोजित करणार असून डॉ. नरेंद्र जाधव यांचे सर्व मराठी ग्रंथ घसघशीत सवलतीच्या दराने उपलब्ध करून देणार आहेत.
   

  Dr Jadhav  Dr Jadhav