Latest News

 • Book Release Dr. Ambedkar

  Book Release by Mr. Kumar Ketkar

  एशियाटिक सोसायटी मुंबई आणि ग्रंथाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या प्रज्ञासूर्य डॉ. आंबेडकर समग्र वैचारिक चरित्र या पुस्तकाचे प्रकाशन, जेष्ठ संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते, आणि एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष शरद काळे यांच्या उपस्थितीत, दिनांक २४ फेब्रुवारी २०१४ रोजी एशियाटिक सोसायटी मुंबई येथे झाले.

 • Great Bhet : Dr. Narendra Jadhav (Video of Interview on IBN Lokmat Tv)

 • डॉ. नरेंद्र जाधव यांचा मुक्त-संवाद

  पुणे मराठी ग्रंथालयाच्या अभ्यासिका विभागाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्ताने अभ्यासिकेच्या ‘आजी-माजी विद्यार्थ्यांचा मेळावा’ पुणे येथे दि. २० ऑक्टोबर २०१३ रोजी आयोजित करण्यात आला होता.
  आजी-माजी विद्यार्थ्यांच्या या मेळाव्यात डॉ. नरेंद्र जाधव यांनी शेकडो विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यावेळी सामाजिक, आर्थिक आणि इतर विषयांसंबधी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. जाधव यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. जवळ जवळ दीड-तास चाललेल्या या रंगतदार कार्यक‘माची ही काही क्षणचित्रे...

  Dr Narendra JadhavDr Narendra Jadhav

 • डॉ. नरेंद्र जाधव यांची ‘साहित्य आणि संवाद-यात्रा’

  ग्रंथाली प्रकाशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित डॉ. नरेंद्र जाधव यांच्या ‘साहित्य आणि संवाद यात्रा’ या प्रकल्पाचे उद्घाटन १९ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे करण्यात आले, त्या प्रसंगाची काही क्षणचित्रे.
  सदर ‘साहित्य आणि संवाद यात्रा’ मराठवाड्यातील औरंगाबाद येथे (२० ते २२ ऑक्टोबर २०१३), लातूर (२४ ते २६ ऑक्टोबर २०१३) आणि नांदेड (२७ ते २९ ऑक्टोबर २०१३) या दिवशी पुस्तक प्रदर्शन आयोजित करणार असून डॉ. नरेंद्र जाधव यांचे सर्व मराठी ग्रंथ घसघशीत सवलतीच्या दराने उपलब्ध करून देणार आहेत.
   

  Dr Jadhav  Dr Jadhav

 • डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नव्या ग्रंथाचे प्रकाशन:
   

  डॉ. नरेंद्र जाधव यांनी सारांश, अनुवाद आणि संपादन केलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र‘ इंग्रजी लेखनकार्य ‘ ‘प्रज्ञा महामानवाची’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समग‘ लेखनकार्य : खंड : एक (राजकीय लेखन), आणि ‘ ‘प्रज्ञा महामानवाची’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र‘ लेखनकार्य : खंड : दोन (अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, कायदा-संविधान आणि धर्मशास्त्र विषयक लेखन) यांचे प्रकाशन प्रा. गंगाधर पानतावणे यांच्या हस्ते औरंगाबाद येथे १९ ऑक्टोबर २०१३ रोजी करण्यात आले.
  दहावी-बारावी पर्यंत शिक्षण झालेल्या कोणत्याही व्यक्तीला सहज समजेल, उमजेल अशा स्वरूपात आणि कोणालाही परवडेल अशा किमान किंमतीमध्ये हे दोन खंड आणि चार भाग, पेपर बॅक पुस्तकांच्या रूपाने देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
  १. ‘प्रज्ञा महामानवाची’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र‘ लेखनकार्य :
  * भाग एक (राजकीय लेखन)
  * भाग दोन (अर्थशास्त्रीय व समाजशास्त्रीय लेखन)
  * भाग तीन (मानववंशशास्त्रीय लेखन)
  * भाग चार (बुद्ध आणि त्यांचा धम्म)
   
 • Dr Jadhav  Dr Jadhav